वैजापूरचे नगराध्यक्षपद ओबीसी महिला, पुरुषांसाठी कही खुशी कही गम..

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : सहा ऑक्टोबर रोजी निघालेल्या सोडतीत वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला व पुरुष यांच्यासाठी सुटले आहे.

त्यामुळे अनेक पक्षांच्या कार्यालयात व कार्यकर्त्यांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुणबी प्रमाणपत्राद्वारे राजकीय आरक्षण मिळाल्यास वैजापुरातून इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच अनेक वर्षापासून निवडणूक रखडल्यामुळे वैजापूर पालिकेवर प्रशासक राज होते त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडताना अडचणी येत होत्या. राजकीय नेत्यांनाही जनतेशी संवाद साधताना अडचणी येत होत्या. 

भाजपकडून डॉ. दिनेश परदेशी शिल्पा परदेसी, दशरथ बनकर शिंदे सेनेकडून आमदार बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे, डॉ. राजीव डोंगरे यांची नावे चर्चेत आहे. पक्षश्रेष्ठी नेमके कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात हे लवकरच समजेल. 

नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी सुटल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. हाजी अखिल शेख विशाल संचेती यांना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायची होती परंतु आरक्षणामुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेली. वीस वर्षापासून वैजापूर नगरपालिकेवरती भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांची एक हाती सत्ता आहे. 

आता पाचव्यानंदा स्वतः ते मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. ही फक्त नगरपालिकेची निवडणूक नसून राजकारणातील आपले वर्चस्व सिद्ध करण्याची निवडणूक आहे.